तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक सन २०२५ मध्ये एकूण १४ प्रभाग आहेत. या सर्व प्रभागांत मिळून एकूण ७१ मतदान केंद्र असणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली. सन २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये एकूण १३ प्रभाग होते. तर नगरसेवक २६ होते तसेच लोक नागरिकांमधून निवडून आलेले नगराध्यक्ष धरून २७ सदस्य सभागृहात होते. या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये २ सदस्यांची वाढ झाल्याने नगराध्यक्ष सह २९ सदस्य सभागृहात राहतील. सदर मतदान केंद्राची प्रारूप मतदान केंद्र यादी नगर परिषदेच्या कक्षात प्रसिद्ध करण्यात आली असून दिनांक ७ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार केंद्र यादी प्रसिद्ध होणार आहे. यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली प्रारूप मतदार केंद्र यादी पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक – मतदान केंद्र संख्या – मतदान करण्याचे ठिकाण १ – ६ – सरस्वती विद्या मंदिर, – २ – ६ – एम आय टी, प्री –स्कूल कॅम्पस/मायमर होस्टेल कॅम्पस, ३ – ६ – इंद्रायणी महाविद्यालय, ४ – ५ – श्री संत ज्ञानेश्वर शाळा, ५ – ४ – आदर्श विद्या मंदिर, ६ – ५ – अँड पु.वा. परांजपे विद्या मंदिर, ७ – ५ – माउंट सेंट अँन हायस्कूल मुख्य इमारत, ८ – ५ – नवीन समर्थ विद्यालय ज्युनिअर कॉलेज – ३ व सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल -२ , ९- ६ – बालविकास विद्यालय , १० – ४ – थोर समाजसेवक नथुभाऊ बाबुराव भेगडे पाटील प्राथमिक शाळा क्र. १, ११ – ६ – वीर जिजामाता प्राथमिक कन्याशाळा क्र. ५, १२ – ४ – सुभाष मार्केट ,सुभाष चौक , १३ – ५ – संत कैकाडी महाराज समाज मंदिर -१,चावडी चौक आंगणवाडी १,तलाठी कार्यालय -१ व गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालय – २, १४ – ४ , मतदान करण्याचे ठिकाण – जैन ज्यूनिअर कॉलेज