विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या तर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी…

मुंबई – राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीच्या प्रचारतोफा आज थंडावल्या आहेत. शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी दिवसभर सभा, मेळावे आणि गाठीभेटींवर भर दिला. या निवडणुकीसाठी सोमवार, दि. 30 जोनवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शिवसेनेतील बंडानंतर प्रथमच विधान परिषदेच्या निवडणूका होत असून खरी लढत भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात होत असून यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
“माझाच आरोग्य प्रमुख हवा’, राज्यातील दोन मंत्र्यांमध्ये शितयुध्द
राज्यातील पाचही जागांची मुदत 7 फेब्रुवारी रोजी संपत आहे. यात नाशिक पदवीधरची निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. या मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने कॉंग्रेसची मोठी नाचक्की झाली. नाशिक पदवीधर मतदारसंघात सध्या अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आणि महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात लढत होणार आहे.
Pune Crime: ट्रकमधून वास आला अन् खुनाचा प्रकार झाला उघड
औरंगाबाद शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे विरुद्ध भाजपचे उमेदवार किरण पाटील अशी लढत होणार आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे डॉ. रणजित पाटील आणि कॉंग्रेसकडून धीरज लिंगाडे हे आमने-सामने आहेत. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपकडून ज्ञानेश्वर म्हात्रे, शिक्षक भारतीचे धनाजी पाटील, शेकाप व महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार बाळाराम पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. तर नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपचे नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे व महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

