Zilla Parishad Election 2026 : 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदानाला सुरुवात; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे होणार मतदान?
Zilla Parishad Election 2026 : आज १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.

Zilla Parishad Election 2026 : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, या निवडणुकीचा निकाल ९ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने तारखांमध्ये बदल केला. त्यानुसार ५ फेब्रुवारी रोजी होणारे मतदान आज ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर मतमोजणीची तारीखही बदलून ९ फेब्रुवारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सबंधित सर्व यंत्रणा, पोलीस सज्ज आहेत.
जिल्हा परिषदेच्या ७३१ आणि पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत ७ हजार ४३८ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या जागांसाठी २ हजार ६३४ तर पंचायत समितीसाठी ४ हजार ८१४ उमेदवार मैदानात उतरले आहेत.
निवडणूक आयोगाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून या मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधित १२ जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
या ठिकाणी होत आहे मतदान
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक होत आहे.
हेही वाचा : Junnar Election : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आज मतदान! ३ लाख ७ हजार मतदार बजावणार हक्क





