पुणे जिल्हा । पळसदेवमध्ये मतदानाचा टक्का वाढला

पळसदेव : पळसदेव (ता. इंदापूर) येथे विधानसभा निवडणुकीसाठी 78.80 टक्के मतदान झाले. अगदी सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पळसदेवमध्ये सुरु होती. दुपारनंतर अचानक मतदार बाहेर पडून त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये विशेषतः तरुण मतदारांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेकांनी कुटुंबातील सर्वच सदस्यांनी एकत्र येऊन मतदान केले. त्यामुळे एकंदरीत पळसदेवमध्ये मतदानाचा टक्के वाढलेला पाहावयास मिळाला.
पळसदेवमध्ये वाड्या वस्त्या मिळून 6251 एकूण मतदार होते. त्यापैकी 4926 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये शिंदेंवस्तीमध्ये टक्केवारीत सर्वाधिक मतदान झाले. शिंदेवस्ती येथे बूथ क्रमांक 36ला एकूण 751 मतदारापैकी 642 (85.26%) मतदारांनी आपला हक्क बजावला.
माळेवाडी बूथ नंबर 35 मध्ये एकूण मतदार 712 पैकी 603 (84%), काळेवाडी बूथ क्रमांक 26ला एकूण मतदार 1249 पैकी 996 (79.55) पोस्टल 37सह, बांडेवाडी बूथ क्रमांक 50मध्ये 625 पैकी 494 (79%) तर पळसदेवमध्ये बूथ क्रमांक 28ला 1468 पैकी 1028 (75 टक्के) व पळसदेवमध्ये बूथ क्रमांक 27ला 1446 पैकी 1163 (79 टक्के ) मतदान झाले.
किरकोळ बाचाबाची वगळता गावात सहाही बुथवर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान केंद्रावर मतदाराच्या यादीतील नाव शोधण्यासाठी अनेक राजकीय पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं.





