लोणंद नगरपंचायत कर्मचाऱ्यांची मतदार जनजागृती रॅली

लोणंद  – लोणंद येथील नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने मंगळवारी शहरातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. खंडाळा तालुक्‍यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचे शहर म्हणून नावलौकिक असलेल्या लोणंद शहरातून नवीन मतदार तसेच जुन्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक बळकट करावी.

यासाठी प्रोत्साहीत करण्याचा प्रयत्न म्हणून नगरपंचायतच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सहभागाने लोणंद नगरीत जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमधे कर्मचाऱ्यांनी आपल्या हातात विविध प्रकारचे मतदार जागृती निर्माण होईल असे पोस्टर्स घेतलेले होते. तसेच यावेळी लोकांनी अधिकाधिक प्रमाणात मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेरणादायी घोषणा दिल्या गेल्या.

सदरची रॅली लोणंद नगरपंचायत पटांगणातून सुरू होऊन, लोणंदच्या मुख्य रस्त्याने शास्त्रीचौकमार्गे महावीर चौक तसेच पुढे बाजारतळमार्गे पुन्हा नगरपंचायतीच्या पटांगणात समारोप अशी काढण्यात आली. यावेळी नगरपंचायतच्या सर्व पुरूष व महिला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत एक राष्ट्रीय कर्तव्याचे महत्व मतदारांना समजावे यासाठी प्रयत्न केला.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.