कीव : युक्रेनने युद्धबंदीसाठी नवीन सुधारीत प्रस्ताव सादर करण्याचा निणर्य घेतला आहे. अमेरिकेच्या मध्यस्थांकडे हा प्रस्ताव गुरुवारी सादर केला जाईल, असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी आज सांगितले. युद्धबंदीच्या मुद्द्यावर झेलेन्स्की उद्या युरोपातल्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी युक्रेनमध्ये युद्धबंदी घडवून आणण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देणारे किमान ३० देशांचे नेते उपस्थित असणार आहेत. या चर्चेमध्ये स्वीकारता येण्याजोग्या अटींच्या आधारे शांतता प्रस्ताव तयार करण्याबाबत चर्चा होण्याची अपेक्षा आहे. ट्रम्प यांच्या शांतता प्रस्तावाला युक्रेन आणि युरोपातल्या देशांनी यापुर्वीच नकार दिला आहे. तरी ट्रम्प यांच्याकडून आपल्या प्रस्तावाचा पाठपुरावा केला जातो आहे. याबरोबरच झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्या प्रस्तावाला नकार दिल्यामुळे वैतागलेल्या ट्रम्प यांनी युक्रेनमध्ये निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. युक्रेनमध्ये निवडणुका न घेण्यासाठी झेलेन्स्की युद्धाची सबब देत असल्याचे ट्रम्प म्हणाले आहे. आश्चर्य म्हणजे शियाचे अध्यक्ष पुतीन यांनी देखील काही महिन्यांपुर्वी असेच विधान केले होते. युद्ध अजूनही थांबलेले नसताना राष्ट्रीय पातळीवरर निवडणुका घेण्याची अपेक्षा ट्रम्प यांनी करावी, याबद्दल आंतराष्ट्रीय समुदायाकडून आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. रशियाबरोबर युद्ध सुरू असताना देशात मार्शल लॉ लागू आहे. त्यामुळे कायद्यानुसार निवडणुका घेतल्या जाऊ शकणार नाहीत, असे झेलेन्स्की पुर्वी म्हणाले होते.मात्र आता ट्रम्प यांच्या अपेक्षेप्रमाणे युक्रेनमध्ये निवडणु घेण्यास आपली तयारी आहे. जर आपले साथीदार युद्ध सुरू असताना निवडणूका सुरक्षितपणे पार पडतील, अशी ग्वाही देणार असतील, तर ३ महिन्यांच्या अवधीमध्ये युक्रेनमध्ये निवडणुका घेतल्या जातील, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.