निवडणूक आयोगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये देशातील सर्व दृष्टीहीन मतदारांना ब्रेल लिपी असणारे फोटोयुक्त मतदार ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व राज्यांमधील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत. 17 व्या लोकसभेसाठी आणि चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी दृष्टीहीन मतदारांना ही ओळखपत्रे देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार देशात असणाऱ्या एकूण 89.6 कोटी मतदारांमध्ये दिव्यांग मतदारांची संख्या जवळपास 45.63 लाख आहे. यामध्ये 28 लाख पुरुष आणि 17 लाख महिलांचा समावेश आहे.