Vladimir Putin: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. युक्रेन युद्ध, देशातील वाढता असंतोष आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या हत्या यामुळे क्रेमलिन प्रशासन सतर्क झाले आहे. एका युरोपीय गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार, पुतिन यांच्या सुरक्षेसाठी आता अत्यंत कडक नियम लागू करण्यात आले आहेत. सीएनएनच्या अहवालानुसार, रशियामध्ये तख्तापलटाची भीती वाढत असल्याने पुतिन यांच्या जवळच्या कर्मचाऱ्यांवरही विशेष लक्ष ठेवले जात आहे. त्यांच्या सुरक्षा यंत्रणांनी पुतिन यांच्या निकटवर्तीयांच्या घरांमध्येही निगराणी यंत्रणा बसवल्याची माहिती समोर आली आहे. (Vladimir Putin) पुतिन यांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये अनेक कठोर नियमांचा समावेश आहे. राष्ट्राध्यक्षांसोबत काम करणारे स्वयंपाकी, अंगरक्षक आणि छायाचित्रकार यांना सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, पुतिन यांना भेटण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींची दोन वेळा तपासणी केली जात आहे. (Vladimir Putin) याशिवाय, पुतिन यांच्या अत्यंत जवळ काम करणाऱ्या लोकांना इंटरनेट नसलेले फोन वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संवेदनशील माहिती बाहेर जाऊ नये आणि हेरगिरी टाळावी, यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे मानले जाते. (Vladimir Putin) Vladimir Putin: पुतिन यांच्यावर हल्ल्याचा धोका? रशियात वाढवली राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा गेल्या काही महिन्यांत रशियामध्ये काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या हत्या झाल्या आहेत. डिसेंबर महिन्यात एका वरिष्ठ जनरलची हत्या झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर रशियाच्या सुरक्षाव्यवस्थेतील अधिकाऱ्यांमध्ये मतभेद आणि चिंता वाढल्याचे सांगितले जात आहे. युक्रेन युद्धामुळे रशियावर आर्थिक आणि राजकीय दबावही वाढत आहे. युद्धातील नुकसान, वाढती महागाई आणि जनतेतील नाराजीमुळे सरकारवर ताण निर्माण झाला आहे. त्यामुळेच क्रेमलिन प्रशासन अधिक सावध झाले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अहवालानुसार, पुतिन यांनी आता काही ठराविक ठिकाणी जाणेही कमी केले आहे. मॉस्को परिसरातील आणि वाल्दाई येथील त्यांच्या खास निवासस्थानी जाणे त्यांनी बंद केले असल्याचे सांगितले जात आहे. वाल्दाई हे पुतिन यांचे उन्हाळी निवासस्थान मानले जाते. रशियामध्ये तख्तापलटाची शक्यता आणि पुतिन यांच्या जीवाला धोका असल्याच्या चर्चांमुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष रशियाकडे लागले आहे. मात्र, या सर्व घडामोडींवर रशियन सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.