कीव : युक्रेनबरोबर कोणताही शांतता करार होण्यापुर्वी तेथे नियुक्त केल्या जाणार्या विधेशी सैन्यालाही रशियाकडून लक्ष्य केले जाईल, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. /क्रेनमध्ये शांती सैन्य तैनात केले जाईल, असे युरोपातल्या नेत्यांन काल पुन्हा एकदा म्हटले होते. त्यानंतर लगेचच पुतीन यांनी हा इशारा दिला आहे. रशियाच्या पूर्वेकडील व्लादिवोत्स्क शहरात ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना त्यांनी हा इशारा दिला. युक्रेनबरोबर शांतता करार झाला तरी नंतर तेथे शांतिसैन्य तैनात करण्याची कल्पनाही पुतीन यांनी फेटाळून लावली आहे. गेल्या ३ वर्षांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी अशा कराराचे पालन रशिया करेल, याबद्दल कोणाच्याही मनात शंका असायला नको. सुरक्षिततेची हमी जशी युक्रेनला हवी आहे, तशीच ती रशियालाही हवी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. युक्रेनमध्ये शांतिसेना तैनात करण्यास २६ देश तयार आहेत, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ कालच म्हणाले होते. युक्रेनच्या मित्र देशांच्या नेत्यांची पॅरिस येथे बैठक झाली. शांतता करारानंतर युक्रेनच्या सुरक्षेसाठी तेथे शांतिसैन्याला तैनात करण्याच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली.