Newasa : आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी केंद्रीय मंत्री कमलेश पासवान यांची घेतली भेट
Newasa : नेवासे विधानसभा मतदारसंघातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत विविध रस्ते विकास कामांना मंजुरी मिळावी यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री कमलेश पासवान यांची भेट घेऊन प्रस्तावांवर चर्चा केली.

Newasa : नेवासा विधानसभा मतदारसंघातील प्रधानमंत्री ग्राम सडक (PMGSY) योजनेअंतर्गत विविध रस्ते विकास कामांना मंजुरी मिळावी, यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी गुरुवारी (दि. ६) नवी दिल्ली येथे केंद्रीय राज्य ग्रामीण विकास मंत्री कमलेश पासवान यांची भेट घेतली. यावेळी मतदारसंघातील विविध प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे तसेच संगमनेरचे आमदार अमोल खताळ उपस्थित होते.
बैठकीदरम्यान ग्रामीण भागातील रस्ते अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि सर्व ऋतूंमध्ये वाहतुकीस सक्षम होण्यासाठी आवश्यक विकासकामांना मंजुरी देण्याची मागणी आमदार लंघे-पाटील यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली.
तसेच नेवासे विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले जावे आणि ग्रामीण भागात सक्षम पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रस्तावित कामांना गती देण्याची आवश्यकता त्यांनी मांडली.





