Vistex Asia चे CEO संजय शाह यांचे हैदराबाद येथे निधन झाले. स्टेज कोसळल्याने संजय शहा यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कंपनीच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते. संजय शाह 56 वर्षांचे होते. शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाले.
२ दिवसांचा होता कार्यक्रम –
विसटेक्स एशियाने हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये रौप्य महोत्सवी कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम 2 दिवसांचा (18-19 जानेवारी) होता. घटनेच्या वेळी घटनास्थळी 700 हून अधिक लोक उपस्थित होते. हे सर्व लोक एरियल शो पाहण्यासाठी जमले होते.
पोलिसांनी सांगितले की, एक खास डिझाईन स्टेज तयार करण्यात आला होता. तो 20 फूट उंच होता. दुर्दैवाने स्टेजच्या लोखंडी वायरचा काही भाग तुटला आणि त्यामुळे स्टेज खाली उभ्या असलेल्या लोकांवर कोसळला. कंपनीचे संस्थापक सीईओ संजय शहा आणि कंपनीचे अध्यक्ष राज दातला यांच्यावर स्टेज कोसळला. दोघांनाही गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र शुक्रवारी सकाळी संजय शहा यांचा मृत्यू झाला. राज यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. पोलिसांनी इव्हेंट मॅनेजमेंट अथॉरिटीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कंपनीची उलाढाल 300 दशलक्ष डॉलर्स –
संजय शाह यांनी 1999 मध्ये Vistex Asia ची स्थापना केली होती. कंपनीने महसूल व्यवस्थापन उपाय आणि सेवा प्रदान केल्या. कंपनीची वार्षिक उलाढाल 300 दशलक्ष डॉलर्स आहे.