व्हिजन क्रिकेट स्पर्धा | व्हिजन लिंक्सेसला विजेतेपद

पुणे – व्हिजन स्पोर्टस सेंटर आयोजित पहिल्या व्हिजन प्रिमिअर लीग अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत व्हिजन लिंक्सेस संघाने व्हिजन लायन्स संघाचा 9 धावांनी पराभव करून विजेतेपद संपादन केले.
या अंतिम सामन्यात कृष्णा पाटील याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर व्हिजन लिंक्सेस संघाने व्हिजन लायन्सचा निसटता पराभव करून विजेतेपद मिळवले. व्हिजन लिंक्सेस पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमावून 145 धावा केल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना व्हिजन लायन्सचा डाव 20 षटकांत 9 बाद 136 धावांवर रोखला गेला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण व्हिजन क्रिकेट अकादमीचे संचालक संतोष मते आणि स्पर्धेचे संचालक गणेश जोशी, अनिल हिंगे यांच्या हस्ते झाले.
संक्षिप्त धावफलक –
अंतिम फेरी ः व्हिजन लिंक्सेस ः 20 षटकात 7 बाद 145 धावा. (निलेश माळी 25, कृष्णा पाटील 28, यशश्री देशमुख 18, शिवा धनगर 2-22) वि. वि. व्हिजन लायन्स ः 20 षटकात 9 बाद 136 धावा (अनिकेत भोसले 25, अविनाश भुजबळ 23, दिक्षित माळी 3-37, कृष्णा पाटील 1-20). सामनावीर ः कृष्णा पाटील.


