चेन्नई -भारताचा ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याला लिजंड्स बुद्धिबळ स्पर्धेत पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. बुधवारी पहिल्या फेरीतही त्याला पराभव पत्करावा लागला होता. शुक्रवारी पुन्हा एकदा त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. या फेरीत त्याला जागतिक अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसन याने 2.5-1.5 याच फरकाने हरवले.
पहिल्या फेरीतही आनंदला रशियाच्या पीटर सिडलरकडून अशाच फरकाने पराभव पत्करावा लागला होता. आता तिसऱ्या फेरीतही त्याचा सामना माजी जागतिक विजेता व्लादिमीर क्रामनिक याच्याशी होणार आहे. क्रामनिकने यापूर्वीही आनंदला अनेकदा पराभूत केले आहे