“माझ्याकडे आता मरणाशिवाय पर्याय नाही, अन् भाजप आता पूर्वीसारखा नाही” ; मुख्यमंत्र्यांकडे ‘या’ भाजप नेत्याची इच्छामरणाची मागणी

Vishambar Yadav Euthanasia। छत्तीसगडमधील एका भाजप नेत्याने मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांना पत्र लिहीत इच्छामरणाची मागणी केली आहे. त्यांनी पत्रात आर्थिक परिस्थितीचा उल्लेख करत खर्च परवडत नसल्याने आपल्याला इच्छामरण द्यावे अशी मागणी केली आहे. सूरजपूर भाजपचे माजी विभागीय सरचिटणीस विशंबर यादव अपघाताचा बळी पडल्यानंतर अपंग झाले. विशंबर यादव यांचे कुटुंब सुरुवातीपासूनच भाजपशी जोडलेले आहे. त्यांचे वडील आरएसएसचे अधिकारी होते.
दोन वर्षांपूर्वी रायपूरमध्ये पंतप्रधान मोदींची एक रॅली होती. त्यावेळी भाजपचे तत्कालीन मंडल सरचिटणीस विशंबर यादव त्यांच्या कार्यकर्त्यांसह या रॅलीत सहभागी होण्यासाठी बसने येत होते. त्यावेळी त्यांच्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात विशंबर यादव गंभीर जखमी होऊन कायमचे अपंग झाले. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यानंतर आणि त्यांना संघटनेकडून पाठिंबा न मिळाल्याने आता त्यांनी इच्छामरणाची मागणी केली आहे.
भाजप आता पूर्वीसारखा नाही Vishambar Yadav Euthanasia।
विशंबर यादव यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, “मी शारीरिकदृष्ट्या खूप कमकुवत झालो आहे आणि माझ्या कुटुंबालाही माझ्यामुळे त्रास होत आहे. ज्या पक्षासाठी मी माझे आयुष्य घालवलं त्या पक्षाकडून मला कोणताही पाठिंबा मिळाला नाही. आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून मी इच्छामरण मागितलं आहे. भाजप आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, पूर्वी कार्यकर्त्यांचा आदर केला जात असे पण आता साधी त्यांची विचारपूस विचारायलाही कोणी येत नाही’ म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
भूपेश बघेल मदतीसाठी सरसावले Vishambar Yadav Euthanasia।
दरम्यान, भाजप नेते विशंबर यादव यांच्या आजाराची माहिती मिळताच, माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल मदतीसाठी पुढे आले आहेत. त्यांनी भाजप नेत्याच्या कुटुंबाशी बोलले आहे. यासोबतच त्यांनी सर्व शक्य उपचारांचं आश्वासन दिलं आहे.
भूपेश बघेल यांनी विशंबर यादव यांच्याविषयी बोलताना, ‘मला माहिती मिळाली की सूरजपूर जिल्ह्यातील भाजप नेते विशंबर यादव यांनी त्यांच्या आजाराच्या उपचारांसाठी आर्थिक अडचणींमुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरण मागितलं आहे. मी विशंबरजी आणि त्यांच्या पत्नीशी फोनवर बोललो आहे. या संकटाच्या वेळी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यांच्या उपचारांसाठी पूर्ण व्यवस्था केली जाईल. त्यांना उपचारासाठी रायपूरला येण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यांना चांगले उपचार मिळावेत आणि ते लवकर बरे व्हावेत यासाठी आमचा प्रयत्न असेल” असे म्हणत त्यांच्या आजारपणाचा समुपर्ण खर्च त्यांनी उचलला आहे.





