मुंबई – सध्या करोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू असल्याने सर्वजण घरातच बसून आहे. या काळात अनेक कलाकारांनी व्हिडिओ शेअर करत काय-काय करता येईल याबाबत मार्गदर्शन केले आहे. तसेच सेलेब्स चालू घडामोडींवरसुद्धा बेधडकपणे त्याची मतं मांडताना दिसत आहे.
Seriously, has someone told Mr. Shah that being “Home Minister” means he has to stay home?
In perhaps the worst internal crisis in living memory, India has an invisible Home Minister.👏🏼👏🏼
We also clearly have a compliant media that won’t ask any questions.👏🏼👏🏼
— VISHAL DADLANI (@VishalDadlani) April 17, 2020
यातच प्रसिद्ध संगीतकार व गायक विशाल दादलानी सोशल मीडियावर त्याच्या ट्विट्समुळे पुन्हा चर्चेत आले आहे. चालू घडामोडींवर तो बेधडकपणे त्याची मतं मांडताना दिसतो. ‘गृहमंत्री म्हणजे त्यांनी घरीच बसायचं असं अमित शाह यांना कोणी सांगितलंय का’, असा खोचक सवाल ट्विटद्वारे करत त्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
विशालने ट्विट केले आहे की,’खरंच, गृहमंत्री म्हणजे त्यांनी घरीच बसायचं असं अमित शाह यांना कोणी सांगितलंय का? देशात इतक्या घडामोडी घडत असताना, इतक्या समस्या असताना आपल्याला अदृश्य गृहमंत्री लाभले आहेत. प्रसारमाध्यमंही त्यांना काहीच प्रश्न विचारत नाहीत.’ तबलिगी मरकज प्रकरण असो किंवा मग वांद्रे येथील गर्दीचे प्रकरण असतो, करोना व्हायरसचे मोठे संकट देशासमोर असताना गृहमंत्री अमित शाह अजूनही शांत का आहेत, असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. विशालने याआधीही ट्विटरच्या माध्यमातून सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.