Virat Kohli World Record in T20 Cricket : आयपीएल २०२६ च्या चालू हंगामात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली कमालीच्या फॉर्मात दिसला असून त्याने संघाला प्ले-ऑफमध्ये पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यात विराट कोहलीकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु तो अवघ्या १५ धावांवर बाद झाला. मात्र, बाद होण्यापूर्वी विराटने मैदानावर एक असा कारनामा केला, ज्याच्या जोरावर त्याने टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील एका फार मोठ्या जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. अॅलेक्स हेल्सला मागे टाकत विराट बनला नंबर वन – टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक फलंदाजांनी मोठे विक्रम केले आहेत, परंतु कोहलीने आता भागीदारीच्या बाबतीत सर्वांना मागे टाकले आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात व्यंकटेश अय्यरसोबत पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी पूर्ण करताच, विराट कोहली टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावांच्या भागीदारीचा हिस्सा असणारा जगातील पहिला क्रमांकाचा फलंदाज बनला आहे.विराट कोहलीच्या कारकिर्दीतील ही तब्बल २११ वी ५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी होती. या कामगिरीसह त्याने इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्सचा २१० भागीदाऱ्यांचा विक्रम मोडला आहे. Another record for Virat Kohli! 💪 Batters involved in most 50-plus stands in Men’s T20s 211 – Virat Kohli* 210 – Alex Hales 200 – David Warner 196 – Babar Azam 191 – Chris Gayle pic.twitter.com/HJdpvAVlKu — Cricbuzz (@cricbuzz) May 22, 2026 टी-२० मध्ये सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावांच्या भागीदाऱ्यांचा हिस्सा असणारे खेळाडू: विराट कोहली (भारत) – २११ वेळा अॅलेक्स हेल्स (इंग्लंड) – २१० वेळा डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – २०० वेळा बाबर आझम (पाकिस्तान) – १९६ वेळा ख्रिस गेल (वेस्टइंडिज) – १९१ वेळा हेही वाचा – Abhishek Sharma Record : अभिषेक शर्माचा ऐतिहासिक धमाका! ख्रिस गेलच्या ‘त्या’ अवाढव्य क्लबमध्ये एन्ट्री मारणारा बनला पहिलाच भारतीय प्ले-ऑफमध्ये इतिहास रचण्याची सुवर्णसंधी; अवघ्या ४३ धावा दूर! विराट कोहली सध्या आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत (ऑरेंज कैप रेस) सातव्या स्थानावर आहे. त्याने १४ सामन्यांत ५०.६३ च्या उत्कृष्ट सरासरीने ५५७ धावा कुटल्या आहेत, ज्यामध्ये १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. हेही वाचा – Angkrish Raghuvanshi Injury : केकेआरला सर्वात मोठा धक्का! प्ले-ऑफच्या ‘करो या मरो’ सामन्यापूर्वी मॅचविनर खेळाडू आयपीएलमधून बाहेर आता प्ले-ऑफच्या सामन्यांमध्ये विराट कोहलीकडे आणखी एक ऐतिहासिक कीर्तिमान रचण्याची सुवर्णसंधी असेल. जर विराटने आगामी सामन्यात आणखी ४३ धावा केल्या, तर तो आयपीएलच्या इतिहासात सलग चार हंगामात ६०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज ठरेल