नवी दिल्ली -रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सोमवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जकडून 8 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात धावांचा अक्षरशः पाऊस पडला.सीएसकेने आरसीबीवर विजय मिळवताच चाहत्यांमध्ये आनंदाचे वातवरण पाहायला मिळाले. मात्र सामन्यानंतर आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीला मोठा धक्का बसला.
विराट कोहलीने RCB विरुद्ध CSK सामन्यादरम्यान IPL आचारसंहितेचा भंग केल्याचे आढळून आले, त्यानंतर मॅच रेफरीने त्याला त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावला. शिवम दुबेच्या विकेटवर विराट कोहलीने आक्रमकपणे सेलिब्रेशन केले होते, जे पाहून मॅच रेफरीने त्याच्यावर ही कारवाई केली.ही चूक कबूल केली आहे.
विराट कोहलीने आपली चूक मान्य केली
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दोषी आढळल्याने त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. असे आयपीएलने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. कोहलीने आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा कबूल केला आहे. आचारसंहितेच्या लेव्हल 1 भंगाबद्दल मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.
घरच्या मैदानावर आरसीबीचा पराभव झाला
227 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फाफ डू प्लेसिस (62) आणि ग्लेन मॅक्सवेल (76) यांनी आरसीबीसाठी झंझावाती खेळी खेळली, परंतु या दोघांनी मिळून संघाला विजय मिळवून दिला नाही. आरसीबी संघाला 20 षटकात 8 गडी गमावून 218 धावा करता आल्या. या विजयासह CSK गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, आरसीबीचा संघ पाचपैकी दोन सामने जिंकून सातव्या स्थानावर आहे.