आज भारत विरद्ध पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जात आहे. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याकडे फक्त भारत आणि पाकिस्तानच नाहीतर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कोहलीने या सामन्यात 14 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला कोहलीने या धावा करून आपल्या नावावर एक ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे.त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडला आहे. कोहली आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 14 हजार धावा करणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे. कोहलीने 299 व्या एकदिवसीय सामन्याच्या 287 व्या डावात ही कामगिरी केली. यापूर्वी हा विक्रम सचिनच्या नावावर होता, ज्याने 350 व्या डावात हा विक्रम केला होता. टीम इंडियासमोर 242 धावांचे आव्हान आजच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाने पाकिस्तानला 3 चेंडूंआधी ऑलआऊट केलं. पाकिस्तानला 49.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 241 धावाच करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 242 धावांचं आव्हान मिळांलं आहे. भारताची प्लेईंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव पाकिस्तानची प्लेईंग 11 : इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद