मशीन काढून ती करू लागली हे काम ! सोबतचे प्रवासी देखील झाले अवाक.. दिल्ली मेट्रोतील मुलीचा VIDEO VIRAL

नवी दिल्ली – मेट्रो ही दिल्लीकरांसाठी लाईफलाईन आहे, परंतु आजकाल दिल्ली मेट्रोमध्ये रील बनवणे हा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध होण्याचा सर्वात सोपा मार्ग बनला आहे. म्हणूनच अनेकदा रिलस्टार मेट्रोने प्रवास करताना दिसतात. अनेकदा अशा गोष्टींचा प्रवाश्यांना त्रास देखील होतो.असाच दिल्ली मेट्रोतील एक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये एक मुलगी दिसत आहे. या मुलीच्या कृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
दिल्ली मेट्रोमध्ये भांडण, अश्लील कृत्ये आणि डान्स यासारखे अनेक प्रकार घडले आहेत. त्याचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एका मुलीने मेट्रोतुन प्रवास करताना अगदी आपल्या घरात करण्याचे काम मेट्रोमध्ये सुरु केल्याने सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मेट्रोमधील या मुलीने आपल्या बॅगेतून हेअर स्ट्रेटणार मशीन काढले. त्यानंतर तिने मेट्रोमधील प्लगमध्ये ते मशीन लावून चक्क मेट्रोमध्ये केसांसाठी लागणारे स्ट्रेटनिंग सुरु केले. यावेळी मुलीला केसांचे स्ट्रेटनिंग करताना पाहून आजूबाजूचे प्रवासी देखील अवाक झाले.केस स्ट्रेटनिंग करणाऱ्या या मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
अब बस दिल्ली मेट्रो में नहाने धोने की सुविधा और हो जाये बस 😂 #DelhiMetro pic.twitter.com/gaCY5QkEvn
— Flying SPACian™ (@TFS2023) June 18, 2023
डीएमआरसीच्या सततच्या इशाऱ्यांनंतरही अशा घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत.तरुणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, तर सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक आपली प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त करत आहेत.अनेकांनी अशा प्रवाशांवर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.





