जळालेल्या विमानाच्या ढिगाऱ्यात ‘भगवद्गीता’ जशीच्या तशी, व्हायरल व्हिडिओने सर्वांनाच केले चकित

अहमदाबाद : अहमदाबाद येथे १२ जून रोजी घडलेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेने (फ्लाइट AI-171) संपूर्ण जग हादरले. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या दिशेने निघालेले बोइंग 787-8 विमान टेकऑफनंतर अवघ्या काही सेकंदांत बी.जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले. या भीषण अपघातात २४१ प्रवाशांसह एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला, यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश आहे. मात्र, या दुर्घटनेतून एक चमत्कारिक घटना समोर आली आहे.
रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान मलब्यातून ‘श्रीमद् भगवद्गीता’चा एक ग्रंथ सापडला, जो पूर्णपणे अक्षत आहे. विमान जळून खाक झाले, परंतु या पवित्र ग्रंथाचे एकही पान जळाले नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक व्यक्ती गीतेची पाने उलटून दाखवत आहे.
बिहारमधील युट्यूबर मनीष कश्यप यांनी हा व्हिडिओ एक्सवर शेअर करत लिहिले, “विमानात एक प्रवासी भगवद्गीता घेऊन प्रवास करत होता. सर्व काही राख झाले, तरी गीता शाबूत आहे.” या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून, अनेकांनी याला चमत्कार मानले आहे, परंतु याची अधिकृत पुष्टी बाकी आहे.
विमान में एक यात्री भागवत गीता लेकर सफर कर रहे थे
भगवत गीता बिल्कुल सही सलामत प्लेन के मलबे में मिला है#AhmedabadPlaneCrash #Gujarat #GujaratPlaneCrash #AirIndiaPlaneCrash
#AirIndiaFlightCrashManaged By – Team pic.twitter.com/Jo0iW352jy
— Manish Kasyap Son Of Bihar (@ManishKasyapsob) June 13, 2025
विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते, यात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनेडियन नागरिक होते. एकमेव वाचलेले प्रवासी विश्वासकुमार रमेश (सीट ११A) यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृतदेहांची ओळख डीएनए चाचणीद्वारे केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातस्थळाची पाहणी करत जखमींची भेट घेतली.





