Viral Video | कोरोनाचे नियम धाब्यावर! माजी आमदाराचा डीजेच्या तालावर डान्स; प्रसिद्ध अभिनेत्रीसह 200 जणांविरुद्ध पोलिसात तक्रार

नवी दिल्ली : एकीकडे देशभरात कोरोनाने हाहाकार माजवलेला असताना दुसरीकडे बिहारमध्ये कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत माजी आमदार मुन्ना शुक्ला यांनी घरी अयोजित केलेल्या कार्यक्रमात डिजेवर डान्स केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंह चा देखील सहभाग होता. मास्क न लावता अक्षरा माजी आमदारासोबत नाचताना दिसतेय. या घटनेनंतर अभिनेत्री अक्षरासह तब्बल 200 जणांविरुद्ध पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार मुन्ना शुक्ला यांनी आपल्या घरी एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात अक्षरानं देखील हजेरी लावली होती. तिनं कार्यक्रमात जबरदस्त डान्स केला. तिच्यासोबत स्वत: मुन्ना शुक्ला आणि त्यांचे कार्यकर्ता देखील थिरकले.
या नाईट पार्टीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये काही पोलीस देखील नाचताना दिसत आहे. परिणामी संतापलेल्या प्रशासनानं या पार्टीत उपस्थित असलेल्या अक्षरासह तब्बल 200 जणांवर कोरोनाचे नियम मोडल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या सर्व मंडळींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी सर्वसामान्य लोक करताना दिसत आहेत.
कोरोना से मुकाबला ऐसे करेंगे ! भोजपुरी फ़िल्म स्टार अक्षरा सिंह, बिहार के बाहुबली पूर्व विधायक मुन्ना शुक्ला, पूर्व विधायक अन्नू शुक्ला का पार्टी में ठुमका लगाने और बगैर मास्क जश्न मनाने का वीडियो वायरल हुआ है. इस वीडियो में एक पुलिस वाला अपना कार्बाइन लहराते हुए भी दिख रहा है. pic.twitter.com/XGqcdQdmbU
— Prakash Kumar (@kumarprakash4u) April 24, 2021





