त्रिपुरा – काही राजकीय नेते हे लोकांच्या हिताचा विचार न करता भलतेच काम करताना दिसतात. नुकतेच त्रिपुरामधील भाजपचे आमदार जादब लाल नाथ हे चक्क सभागृहातच पॉर्न व्हिडिओ पाहताना आढळून आले आहे. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ते त्यांच्या फोनवरच पॉर्न व्हिडीओ पाहत असल्याचे दिसत आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे.
यावर आमदार जादब लाल नाथ यांनी “सभागृहात मोबाईल फोन वापरण्यास मनाई असल्याचे मला माहित आहे. पण माझ्या फोनवर वारंवार कॉल येत होते. मी कॉल घेतला आणि नंतर माझ्या फोनवर अश्लील व्हिडीओ येऊ लागले. त्यानंतर मी ते बंद केले,” असे स्पष्टीकरण दिले. सध्या यावर अनेकजण संताप व्यक्त करत आहे.
So, BJP MLAs keep the legacy of watching porn during the Assembly sessions!
Now, BJP MLA from Bagbassa, north tripura Jadab Lal Nath was caught watching porn during the Tripura Assembly session.
Shame!#ModiHaiTohMumkinHai#SanskariRSS #BJPFailsIndia pic.twitter.com/iVyoF6fNj5— Mayukh Biswas (@MayukhDuke) March 30, 2023
अशी घटना घडण्याची ही काही पाहिलच वेळ नाही. याआधी सहकार मंत्री लक्ष्मण सवदी आणि बालविकास मंत्री सी.सी.पाटील हे दोन मंत्री सभागृहात पॉर्न व्हिडीओ पाहताना आढळले होते. त्यावेळी ही त्यांना पदावरून बडर्तफ करण्याची मागणी केली होती.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे भाजपवर टीका केली जात आहे. दरम्यान, त्रिपुरामधील बागबासा विधानसा मतदारसंघातील जादब लाल नाथ आमदार आहेत. त्यांनी बिजिता नाथ यांना पराभूत करत विजय मिळवला होता.