सलूनमध्ये करत होता कटिंग; शाहरुखचं गाणं सुरु झालं आणि तो ढसाढसा रडू लागला

Updated On:

सोशल मीडिया हे असे व्यासपीठ आहे जिथे कधीही काहीही व्हायरल होते. डब्बू अंकल नाचणारे असोत, आपल्या गायनाने लोकांना चकित करणारी रानू मंडल असो किंवा ‘कच्चा बदाम’ गाऊन शेंगदाणे विकणारा बंगालचा भुबन असो. प्रत्येकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपली छाप पाडली. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामसारख्या अनेक सोशल मीडिया साइट्सवर दररोज अनेक व्हिडिओ अपलोड केले जातात, त्यापैकी काही झटपट हिट होतात आणि काही महिन्यांनंतर व्हायरल होतात.

अनेकदा असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होतात, ज्यामुळे लोकांना खूप आनंद होतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या फिरत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती व्यक्त कराल, पण तुमचे हसू रोखू शकणार नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकतो की दुकानात शांतपणे बसलेला एक माणूस केस कापत आहे. त्यावेळी दुकानात गाणी देखील सुरु होती. बऱ्याचदा आपण जेव्हा सलूनमध्ये जातो तेव्हा त्या ठिकाणी कोणती ना कोणती गाणी वाजत असतात. अशातच एक विचित्र प्रकार समोर आलाय शाहरुख आणि माधुरी दीक्षितच्या चित्रपटातील गाणे वाजताच त्या माणसाला आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि त्याला रडू कोसळले.

‘हम तुम्हारे हैं, तुम्हारे सनम’ या चित्रपटातील ‘तेरे वादे वो इरादे’ हे हिट गाणे वाजताच, हे गाणे ऐकून ग्राहक थोडा भावूक आणि अचानक तो ढसाढसा रडू लागला. त्याचे अश्रू पाहून आधी तिथे बसलेल्या लोकांना समजले नाही पण नंतर लोकांना देखील या दृश्यावर हसू आवरता आले नाही.

हा व्हिडिओ फेसबुकवर सुपीरियर सारकासम नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 1 वर्षापूर्वीचा असला तरी सध्या तो खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सलून वाल्यानी अशी गाणी वाजवू नका, यार’. व्हिडिओवर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Vidyut Jammwal: तब्बल 15 मिनिटे श्वास रोखून धरला; विद्युत जामवालचा व्हिडीओ पाहून सारेचं थक्क

2026-10-06 12:43:32

Vidyut Jammwal: तब्बल 15 मिनिटे श्वास रोखून धरला; विद्युत जामवालचा व्हिडीओ पाहून सारेचं थक्क

Newasa News : "साहेब, तुमच्यासाठी नवस केलाय!" प्रवासात आलेल्या एका फोनने जिंकली मनं; आमदार लंघे-पाटील यांचा माणुसकीचा प्रत्यय

2026-10-03 15:49:44

Newasa News : "साहेब, तुमच्यासाठी नवस केलाय!" प्रवासात आलेल्या एका फोनने जिंकली मनं; आमदार लंघे-पाटील यांचा माणुसकीचा प्रत्यय

Social Media : आभासी दुनियेचा विळखा: रील्स आणि लाईक्सच्या नादात अख्खी पिढी भरकटतेय?

2026-09-22 21:38:48

Social Media : आभासी दुनियेचा विळखा: रील्स आणि लाईक्सच्या नादात अख्खी पिढी भरकटतेय?

Jyotiraditya Scindia : "...तर मतदान करणार नाही," तरुणाने इशारा देताच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे संतापले

2026-09-19 12:18:53

Jyotiraditya Scindia : "...तर मतदान करणार नाही," तरुणाने इशारा देताच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे संतापले

Jahnavi Killekar Video : रीलस्टार्सनी घेतली मराठी कलाकारांची जागा.! जान्हवी किल्लेकरच्या व्हायरल VIDEO नंतर किरण माने संतापले; दहीहंडीच्या मंचावर नेमकं काय घडलं?

2026-09-08 19:23:57

Jahnavi Killekar Video : रीलस्टार्सनी घेतली मराठी कलाकारांची जागा.! जान्हवी किल्लेकरच्या व्हायरल VIDEO नंतर किरण माने संतापले; दहीहंडीच्या मंचावर नेमकं काय घडलं?