कर्नाटक: दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला खातेही उघडता आले नाही. तर आम आदमी पार्टी फार काही कमाल करू शकली नाही. अशातच कर्नाटक राज्यातील म्हैसूर जिल्ह्यातील उदयगिरी भागात असणाऱ्या पोलीस स्टेशनला काही लोकांनी सोमवारी रात्री उशिरा घेराव घालत निर्दर्शने केली. या घटनेमुळे येथे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.
सोशल मीडियावर मुस्लिम समाजाबाबत अपमानकारण पोस्ट व्हायरल करण्यात आली होती. तसेच या पोस्टमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादव, केजरीवाल यांची अर्धनग्न छायाचित्रे प्रसारित करण्यात आली होती. या पोस्टनंतर या भागात मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं?
कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातील उदयगिरी भागात सोमवारी रात्री मुस्लिम समाजातील शेकडो लोकांनी उदयगिरी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही तरुणांनी पोलिस कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर परिस्थितीन नियंत्रणाबाहेर गेली. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. अश्रूधुराच्या नळकांड्याही सोडण्यात आल्या. या घटनेत काही जण जखमी झाले आहेत. आंदोलकांनी शांतीनगर मुख्य रस्ता आणि महादेवपुरा रस्ता अडवून संताप व्यक्त केला.
पोस्टमुळे तणाव
एका व्यक्तीने मुस्लिम समाजाविरोधात केलेल्या पोस्टमुळे हा गदारोळ झाला असल्याचे समजते. सोशल मीडियावर मुस्लिम समाजाबद्दल अपमानास्पद पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी पोलिसांनी 32 वर्षीय सुरेशला पोलिसांनी अटक केली आहे. आंदोलकांनी संबंधित व्यक्तीवर आरोप केला की, दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधी, केजरीवाल आणि अखिलेश यादव यांची अर्धनग्न छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.
ज्यामध्ये एक व्यक्ती त्यांच्या मांडीवर नमाज अदा करत होती. व्हायरल झालेल्या फोटोवर अनेक अरबी अक्षरे लिहिलेली असल्याचे आंदोलकांनी सांगितले. ‘थ्री इडियट्स’ असे शीर्षक असून ते व्हायरल झाले होते. परिसरातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून व्हायरल झालेल्या फोटोबाबत त्याची चौकशी केली जात आहे.