Ajay Devgan : दिल्लीत अभिनेता अजय देवगणला बेदम मारहाण?, जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं ‘सत्य’

नवी दिल्ली – बाॅलिवूड अभिनेता अजय देवगणला मारहाण झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ खोटा असल्याचे अजय देवगणच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. ‘हा व्हिडीओ खोटा असून अजय देवगण एका चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. मागील 14 महिन्यांपासून त्याने दिल्लीत पाऊलही ठेवलं नाही, असं प्रवक्त्याने सांगितले आहे.

सविस्तर माहिती अशी की, दोन दिवसांपासून सोशल मीडियावर अजय देवगणला मारहाण झाल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. शेतकरी आंदोलनाचे समर्थन न करण्यावरून आणि सरकारची बाजू घेतल्यामुळे दिल्लीत एका पबच्या बाहेर काही लोकांनी त्याला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हा व्हिडीओ खोटा आणि अफवा पसरवणारा असल्याचे अजयच्या प्रवक्त्याने सांगितेलेय.

‘अजय देवगण एक जबाबदार वर्तणूक आणि सामाजिक शिष्टाचारासाठी ओळखले जातात. माध्यमांना विनंती आहे की त्यांची बदनामी करणाऱ्या खोट्या बातम्या प्रसारित करू नयेत. त्याआधी त्यांची प्रामाणिकता पाहून घ्यावी. ते गेल्या काही दिवसांपासून ‘मैदान’, ‘मेडे’, आणि ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्यांनी गेल्या 14 महिन्यांपासून दिल्लीत पाऊलही ठेवले नाही. त्यामुळे त्यांच्याबाबतचा तो व्हिडीओ खोटा आहे.’ असे अजय देवगणच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.