वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट? देशमुख कुटुंब थेट CCTV फुटेज मागवणार

Walmik Karad | मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे. मात्र मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबाच्या सदस्यांनी कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकाराखाली सीसीटीव्ही फुटेज मागविले आहेत.
जिल्हा कारागृहामध्ये वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. वाल्मिक कराडसह इतर आरोपींना देखील सुविधा पुरविल्या जात आहेत. त्याचबरोबर नियमबाह्य सुविधा देखील पुरवल्याचा आरोप देशमुख कुटुंबीयांनी आणि लोकप्रतिनिधींनी केला आहे. या सर्व प्रकाराविषयी आता कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकारात सीसीटीव्ही फुटेज मागितले जाणार असल्याचं देशमुख कुटुंबाच्या सदस्यांनी सांगितले. Walmik Karad |
बीड जिल्हा कारागृहात ज्या दिवशी आरोपींची रवानगी करण्यात आली. त्या दिवसापासूनचा सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी, माहितीचा अधिकार जिल्हा कारागृहाधिक्षकांकडे संतोष देशमुख यांचे नातेवाईक दादा खिंडकर देणार असल्याची माहिती मिळाली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी आणि हत्येच्या आरोपाखाली वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मकोका देखील लावण्यात आला आहे. तर कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे.
१४०० पानांचे दोषारोपपत्र दाखल
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह इतर 8 आरोपींच्या विरोधात सीआयडी 1400 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हे दोषारोपपत्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने विशेष मकोका न्यायालयात दाखल केले आहे.
उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती
दुसरीकडे, या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मोठी घोषणा केली. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर ॲड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हेही वाचा:





