VIP पक्षाचे प्रमुख मुकेश सहनी यांच्या वडिलांची निर्घृण हत्या; बिहारमधील धक्कादायक घटना समोर

Mukesh Sahani| विकासशील इंसान पार्टी (VIP) चे प्रमुख आणि बिहार सरकारचे माजी मंत्री मुकेश सहनी यांचे वडील जीतन सहनी यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. काही अज्ञातांनी घरामध्ये घुसून मुकेश साहनी यांचे वडील जीतन साहनी यांच्यावर धारधार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बिहारच्या दरभंगामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
जीतन साहनी यांचा मृतदेह दरभंगा येथील सुपौल बाजार येथील अफझला पंचायत येथील त्यांच्या राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडल्याचे आढळून आले. ही हत्या कोणी केली आणि का केली याबाबात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्या दृष्टीने आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मुकेश साहनी यांचे वडील जीतन साहनी दरभंगाच्या सुपौल बाजारच्या अफझला पंचायतीच्या बिरौलमध्ये एकटेच राहत होते. घरामधील एका खोलीत जीतन साहनी यांचा मृतदेह आढळून आला असून घरातील सर्व सामान विखुरलेले पडले होते. त्यांना मुकेश साहनी आणि संतोष साहनी ही दोन मुले आणि एक मुलगी आहे. ती मुंबईत राहते. Mukesh Sahani|
मुकेश साहनी कोण आहेत ?
मुकेश साहनी हे विकासशील इंसान पार्टीचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते बिहारमधील पशुसंवर्धन आणि मत्स्यसंपदा मंत्री राहिले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत मुकेश साहनी यांनी भाजपचा प्रचार केला. त्यानंतर त्यांनी विकासशील इंसान पार्टीची स्थापना केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाला. लोकसभा निवडणुकीत साहनी यांनी तेजस्वी यादव यांच्यसोबत बिहारमध्ये अनेक सभा घेतल्या होत्या. Mukesh Sahani|
हेही वाचा:





