Nevasa : नेवासा सबरजिस्ट्रार कार्यालयात तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन; छावा संघटनेचा आरोप, केली कारवाईची मागणी

नेवासा : नेवासा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सबरजिस्ट्रारांनी तुकडाबंदी कायदा लागू असतानाही अनाधिकृतपणे गेल्या पंधरा दिवसांत तीन ते चार खरेदी खत दस्तऐवज करण्यात आले असल्याची धक्कादायका बाब समोर आली आहे. यामुळे कायद्याचे व नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नेवासा येथील सब रजिस्ट्रार यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, अशा मागणी आखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनच्यावतीने करण्यात आली आहे.
तसे निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी जिल्हा मुद्रांक अधिकारी तथा सहजिल्हा निबंधक वर्ग १ अहिल्यानगर व प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे. अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनचे जिल्हाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निवेदन केले आहे. याबाबत नेवासा सब रजिस्ट्रारांना त्वरीत निलंबित न केल्यास आखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनच्यावतीने मोठे अांदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
छावा संघटनेचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उपविभागीय आधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अहिल्यानगर यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. अधिनियम १९४७ नुसार तुकडाबंदी कायदा असून यामध्ये महाराष्ट्र जमीन तुकडे पाडण्यास प्रतिबंध असून जमीनीच्या तुकडे व विभाजन करण्यास मनाई करण्याबाबत हा कायदा अस्थित्वात आहेय जमिनीचे मोठे तुकडे एकत्र ठेऊन शेती योग्य जमीनीचे संरक्षण करण्यासाठी शासनाने रेड झोन, येलो झोन व ग्रीन झोन असे जमीनीचे विभाजन केले आहे.
त्यानुसार विभाजनावर नियम व अटी लागू केलेल्या असूनही हे सर्व नियम ढाब्यावर बसवून ४२ (अ), ४२ (ब), ४२ (ड) या नियमांचे उल्लंघन करुन जमिनीचे तुकडे केले. यासाठी कोणत्याही प्रकाराचे रेखांकन केले नाही. तसेच कोणतेही प्रकारची मंजुरी घेतलेली नाही. खरेतर आता ४२(ब) व ४२(ड) करण्यासाठी भूमी अभिलेखचा दाखला लागतो, येलो झोन आहे का तपासला जातो ?
अशा प्रकारे सर्व नियम ढाब्यावर बसवून दस्तऐवज खरेदीखत झालेले असून यामध्ये समावेश असलेले शेती रजिस्ट्रार, मंडल अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांची तातडीने चौकशी करण्यात यावी. तसेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा छावा संघटनेच्यावतीने तालुक्यासह जिल्ह्यात आंदोलन उभारणार असल्याचे चव्हाण यांनी यावेळी बोलतांना सांगितले.





