विनयभंग प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा
Updated On:

पुणे – कसबा पेठेतील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका 36 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार डॉ. अनिरुद्ध नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मुलास कसबा पेठेतील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यावेळी आरोपी डॉक्टरने महिलेच्या अंगाला स्पर्ध करून विनयभंग केला. तसेच, महिला झोपल्यानंतर येऊन महिलेचा विनयभंग केला. महिलेला व्हॉट्सऍपवर अश्लिल मेसेज पाठवून मनाज लज्जा होऊल, असे वर्तन केले. याप्रकरणी महिलेने तक्रार दिल्यानंतर डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस अधिक तपास करत आहेत.





