मुंबई – सिनेसृष्टीतील प्रसिद्ध विनोदवीर आणि उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे प्रमुख राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांना एका अज्ञात व्यक्ती कडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राजू श्रीवास्तव म्हणतात कि, “मला आणि माझे सहयोगी अजीत सक्सेना आणि गरवित नारंग यांना देखील धमकीचे फोन आले आहेत. व्हाट्सऍप कॉलद्वारे (WhatsApp call) संबंधीत व्यक्तींना फोन करण्यात आल्याचं राजू सांगतात.
दरम्यान, सर्व याप्रकरणी राजू श्रीवास्तव यांनी कानपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस याबाबत तपास करत आहेत. तसेच या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी राजू यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांना व्हाट्सऍप कॉलद्वारे (WhatsApp call) हा धमकीचा फोन आला होता. यात त्यांच्या पत्नी आणि मुलांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे.