विनोद तावडेंचे राजकीय वजन वाढलं ! भाजपने त्यांच्यावर सोपवली ‘ही’ जबाबदारी

नवी दिल्ली : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी सामोर आली आहे. विनोद तावडे यांना भाजप सदस्यता नोंदणी अभियानाचं प्रमुख करण्यात आलं आहे. आजपासून भाजप सदस्यता नोंदणी सुरू करत आहे. नवी दिल्लीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विनोद तावडे यांच्याकडे सदस्यता नोंदणी अभियानाचं प्रमुख पद देण्यात आलं आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीचं तिकीट कापल्यानंतर विनोद तावडे यांना भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय राजकारणात गेल्यानंतर विनोद तावडेंना भाजपचे राष्ट्रीय सचिव करण्यात आलं. तसंच त्यांच्यावर बिहारसारख्या महत्त्वाच्या राज्याच्या प्रभारी पदाची जबाबदारीही देण्यात आली होती.
यानंतर आता भाजप सदस्यता नोंदणी अभियानाचं प्रमुख करण्यात आल्याने त्यांचं प्रमोशन झाले असं म्हणायला काही हरकत नाही. या बैठकीला राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसोबतच सर्व प्रदेशाध्यक्ष, सर्व राज्य सरचिटणीस आणि राज्यांच्या सदस्यत्व संघाचे अधिकारी उपस्थित होते.





