सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी ब्रँडला चांगलेच धारेवर धरले आहे. देशासाठी अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या एका महान खेळाडूच्या खालावलेल्या आर्थिक आणि शारीरिक परिस्थितीचे भांडवल करून, आईस्क्रीम विकण्यासाठी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणे अत्यंत असंवेदनशील असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. कोणत्याही व्यक्तीच्या वाईट काळाचा वापर व्यावसायिक लाभासाठी करणे जाहिरात विश्वात चुकीचे मानले जात आहे.
\nहेही वाचा – Virat Kohli Argument : अहमदाबादमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! रजत पाटीदारच्या वादग्रस्त विकेटवर विराट कोहली संतापला; फोर्थ अंपायरशी झाली बाचाबाची
\n
\nया वादानंतर जाहिरात मोहिमेचे क्रिएटिव्ह लीड गुंजन गाबा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जाहिरातीला ९५ टक्के लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, विनोद कांबळी यांची जिद्द आणि त्यांच्या आयुष्यातील छोट्या आनंदांना साजरे करणे हाच यामागचा मुख्य हेतू होता, असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु, ब्रँडच्या या स्पष्टीकरणानंतरही लोकांचा रोष कमी झालेला नाही. जाहिरातीचा हेतू चांगला असला तरी, त्याची मांडणी अतिशय असंवेदनशील असल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त केली आहे.