Budapest Ranking Series 2023 : विनेश फोगटची ‘या’ कारणामुळे रॅंकिंग सिरीजमधून माघार
Updated On:

नवी दिल्ली :- दोन वेळा विश्वविजेती कुस्तीपटू विनेश फोगटने अन्नातून विषबाधा झाल्याचे कारण देत बुडापेस्टमध्ये शुक्रवारी उशिरा झालेल्या 55 किलो वजनी गटाच्या रॅंकिंग सिरीज स्पर्धेतून माघार घेतली आहे.
आयोजकांसह भारतीय क्रीडा प्राधिकरणालाही (साई) या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीने (नाडा) विनेशला आवश्यकतांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल नोटीस जारी केली होती.
या नोटीसला उत्तर देण्यासाठी विनेशकडे 14 दिवसांचा कालावधी आहे. असे असले तरी विनेशला काळजी करण्याची गरज नाही.
कारण 12 महिन्यांत पहिल्यांदाच तिला ही नोटीस बजाविण्यात आली असून, वर्षात तीन पेक्षा अधिक वेळा नियम उल्लंघन होऊन “नाडा’कडून नोटीस आल्यास खेळाडूला चार वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.





