Vinesh Phogat Relief by Delhi HC : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटला दिल्ली उच्च न्यायालयाने एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक दिलासा दिला आहे. आई झाल्यानंतर कुस्तीच्या आखाड्यात पुनरागमन करू पाहणाऱ्या विनेशच्या आड येणाऱ्या भारतीय कुस्ती महासंघाला (WFI) न्यायालयाने तीव्र शब्दांत फटकारले आहे. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले की, “आई होणे हा गुन्हा नाही” आणि कोणत्याही खेळाडूला केवळ “सूडाच्या भावनेने” वागवले जाऊ शकत नाही. खेळ हा कोणत्याही वैयक्तिक शत्रुत्वापेक्षा खूप मोठा आहे आणि खेळाडूंच्या भविष्याशी असा खेळ करणे खेळाच्या हिताचे नाही, असे न्यायालयाने सुनावले. हायकोर्टाचे केंद्र सरकारला आदेश; तज्ज्ञांची समिती स्थापन करा मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारला तात्काळ निर्देश दिले आहेत. विनेश फोगाटच्या तंदुरुस्तीचे (फिटनेस) आणि ती स्पर्धेत परतण्यासाठी किती सज्ज आहे याचे मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञांची समिती तातडीने स्थापन करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, आगामी आशियाई खेळांच्या निवड चाचण्यांमध्ये विनेशला कोणत्याही परिस्थितीत सहभागी होण्याची संधी दिलीच पाहिजे, असा कडक आदेश न्यायालयाने दिला आहे. “WFI चा हा अचानक बदल बरंच काही सांगून जातो!” STORY | HC pulls up WFI over decision to declare Vinesh Phogat ineligible The Delhi High Court on Friday pulled up the Wrestling Federation of India (WFI) for its decision to declare celebrated grappler Vinesh Phogat “ineligible” from participation in domestic events and asked… pic.twitter.com/Oh2HJTXT94 — Press Trust of India (@PTI_News) May 22, 2026 सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने कुस्ती महासंघाच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून टीका केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना पूर्वी नियमात सवलत देऊन दिलासा देण्यात आला आहे, मग विनेशच्याच बाबतीत नियमांमध्ये झालेला हा अचानक बदल “बरेच काही सांगून जातो,” असे खंडपीठाने नमूद केले. “या देशात मातृत्वाचा आदर केला जातो… त्याचा वापर एखाद्या महिला खेळाडूच्या कारकिर्दीविरुद्ध शस्त्र म्हणून केला जाऊ शकत नाही,” अशा कडक शब्दांत न्यायालयाने डब्लूएफआयला सुनावले. कुस्ती महासंघाच्या ‘त्या’ नोटीसवर न्यायालय संतप्त! कुस्ती महासंघाने विनेशला २६ जून २०२६ पर्यंत देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळण्यास ‘अपात्र’ घोषित केले होते. निवृत्तीनंतर पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंना उत्तेजक-विरोधी नियमांनुसार (Anti-Doping Rules) ६ महिन्यांची पूर्वसूचना देणे आवश्यक असल्याचा दावा संघटनेने केला होता. तथापि, जुलै २०२५ मध्ये आई झालेल्या विनेशने गोंडा येथील राष्ट्रीय खुल्या मानांकन स्पर्धेत भाग घेतला होता. हेही वाचा – CSK Team Fined : प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या सीएसकेला बीसीसीआयचा दणका! संपूर्ण संघावर केली मोठी कारवाई विनेशने न्यायालयात युक्तिवाद केला की, ९ मे रोजी महासंघाने बजावलेली ‘कारणे दाखवा नोटीस’ हा केवळ तिला स्पर्धेतून वगळण्याचा सूडबुद्धीने केलेला प्रयत्न होता. विशेष म्हणजे, या नोटीसमध्ये महासंघाने २०२४ च्या ऑलिम्पिकमधील विनेशच्या १०० ग्रॅम वजन जास्त भरल्याच्या अपात्रतेचा उल्लेख ‘राष्ट्रीय लाजिरवाणी गोष्ट’ असा केला होता. या भाषेवर न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. २०२३ मधील ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधातील ऐतिहासिक महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा विनेश हा प्रमुख चेहरा होती, ज्यामुळे तिला लक्ष्य केले जात असल्याचा संशय आहे.