पिंपरी | गावखेड्यातील विद्यार्थीही करणार ‘डिजिटल स्टडी’

पवनानगर, (वार्ताहर) – पवनमावळ भागातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय शिवली आणि पवना विद्या मंदिर शाळा येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी उपयोगी असलेले स्टडी ॲपचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ मावळ यांच्या वतीने आणि पदाधिकारी, सदस्यांच्या उपस्थितीत याचे वाटप झाले. डिजिटल ॲपमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ होण्यासाठी मदत होणार आहे.
यावेळी निकिता घोटकुले, मुकुंद ठाकर, रघुनाथ लोहार, प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, ज्ञानेश्वर आडकर, रोटरी क्लब मावळचे अध्यक्ष नितीन घोटकुले, उपाध्यक्षा रेश्मा फडतरे, पूनम देसाई, सुनिल पवार, नितिन लायगुडे, जयवंत घारे, रत्नावली इंगळे, अमोल कामत, राजेंद्र दळवी, स्नेहल घोटकुले, संजय घारे, दीपक आडकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मिळालाय डिजिटल गुरु –
शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच दहावीच्या विद्यार्थ्यांना स्टडी ॲप म्हणजेच डिजिटल गरु मिळाला आहे. या ॲपच्या माध्यमातून व्हिडिओ, प्रश्नसंच, कृतीपत्रिका आणि बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी अभ्यासक्रम अशी अनेक उपयोगी माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा वापर करावा, असे मार्गदर्शन नितीन घोटकुले यांनी केले. यावेळी अमोल कामत, निकिता घोटकुले, सुनिल पवार आदींनी मनोगते व्यक्त केली.





