बारामती : बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार गावाजवळील राज्य मार्गावर सोमवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातात एका ग्रामसेवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून संतप्त नागरिकांनी काही काळ रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले. मधुकर धोंडीबा जगताप (रा. भिलारवाडी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. ते मेडद ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. सोमवारी रात्री काम आटोपल्यानंतर ते आपल्या घरी परतत असताना जळगाव कडेपठार परिसरात अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, जगताप यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची बातमी कळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. या राज्य मार्गावर अद्यापही गतिरोधक नसल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. याच पार्श्वभूमीवर जळगाव कडेपठार येथे काही काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मारे एक तास चाललेल्या या रामताकडे जाणारी व येणारी आंदोल वाहतूक विस्कळीत झाली होती.घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे व त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत परिस्थिती नियंत्रणात आणली. बांधकाम विभागाकडून लवकरच येथे गतिरोधक उभारले जातील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, अपघात घडवून पसार झालेल्या वाहनाचा क्रमांक पोलिसांना मिळाला असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे यांनी दिली. एक तास वाहतूक विस्कळीत जगताप यांच्या आकस्मिक निधनामुळे भिलारवाडी व मेडद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची बातमी कळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. राज्य मार्गावर अद्यापही गतिरोधक नसल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. याच पार्श्वभूमीवर जळगाव कडेपठार येथे काही काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे एक तास चाललेल्या या आंदोलनामुळे बारामतीकडे जाणारी व येणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. हेही वाचा : Pune District : जुन्नरला इंधन आणि गॅस टंचाईची अफवा