Vikrant Massey 12 th Fail Film | अभिनेता विक्रांत मेस्सीचा ’12 वी फेल’ चित्रपट सुपरहिट ठरला. हा चित्रपटात आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनप्रवासावर आधारित आहे. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित ’12वी फेल’ने जागतिक स्तरावर यश मिळवले आहे. आता रविवारी शांघाय फिल्म फेस्टिव्हलच्या समारोप समारंभात तो दाखवला जाणार आहे. हा चित्रपट महोत्सव 14 जूनपासून सुरू झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा ’12 वी फेल’ दमदार कामगिरी चर्चेत आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विक्रांत फिल्म फेस्टिव्हलमध्ये ’12वी फेल’च्या स्क्रीनिंगला उपस्थित राहणार आहे. मात्र, त्याच्याशिवाय चित्रपट महोत्सवात आणखी कोण जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अलीकडेच चित्रपटाने चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर रिलीज होऊन हा चित्रपट सातासमुद्रा पार गेला आहे. जिथे हा चित्रपट 20 हजाराहून अधिक स्क्रीनवर दाखवला गेला. Vikrant Massey 12 th Fail Film | या चित्रपटात वास्तविक जीवनात UPSC स्पर्धक असलेल्या मनोज कुमार यांच्यासमोरील आव्हाने दाखवण्यात आली आहेत. यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. आयपीएस मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनाची रूपरेषा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. ज्यांनी गरिबीवर मात करून आयपीएस अधिकारी होण्याच्या प्रवासाला सुरुवात केली. यात विक्रांत मुख्य भूमिकेत असून अभिनेत्री मेधाने IRS अधिकारी श्रद्धा जोशीची भूमिका साकारली आहे, जी मनोज कुमार शर्मा यांची पत्नी दाखवण्यात आली आहे. Vikrant Massey 12 th Fail Film | हेही वाचा: ‘अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जावं’