विक्रांत मॅसीने धुमधडाक्यात साजरा केला लेकाचा पहिला वाढदिवस, शेअर केले खास फोटो

Vikrant Massey Reveals Son Face: अभिनेता विक्रांत मॅसीने गेल्याकाही वर्षात ’12th फेल’, ‘फिर आई हसीन दिलरुबा’ आणि ‘साबरमती रिपोर्ट’ सारखे एकापेक्षा एक लोकप्रिय चित्रपटात काम केले आहे. विक्रांतने त्याच्या अभिनयातून स्वतःची एक वेगळी छाप सोडली आहे. नुकताच विक्रांतचा मुलगा वरदानचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. अभिनेत्याने मुलाच्या वाढदिवसाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मुलगा वरदानचा पहिल्या वाढदिवस असल्याने विक्रांतने धुमधडाक्यात सेलिब्रेशन केले. याशिवाय, पहिल्यांदाच त्याने मुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जन्मदिनाच्या तीन दिवसांनंतर त्याने सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सर्वांना चकित केले. त्याच्या मुलाचा चेहरा पाहून चाहत्यांनी अभिनेत्याला शुभेच्छा पाठवायला सुरुवात केली आहे. विक्रांतच्या मुलाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
View this post on Instagram
वरदान आता एक वर्षांचा झाला असून, 7 फेब्रुवारीला त्याता पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. यापूर्वी विक्रांतने मुलाचे फोटो सोशल मीडियावर कधीच शेअर केले नव्हते. आता वाढदिवसाच्या निमित्ताने सेलिब्रेशनचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले. या फोटोमध्ये वरदान व्हाइट फॉर्मल शर्ट, पँट आणि शूज अशा लूकमध्ये सुंदर दिसत आहे.
दरम्यान, विक्रांत आणि शीतलच्या प्रेमाबद्दल सांगायचे तर दोघे 2015 पासून एकमेकांना डेट करत होते. 18 फेब्रुवारी 2022 रोजी हिमाचल प्रदेशात दोघांनी पारंपरिक पद्धतीने लग्न केले. लग्नाच्या एक वर्षानंतर 7 फेब्रुवारी 2023 ला शीतलने बाळाला जन्म दिला. अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचे तर तो लवकरच ‘आंखों की गुस्ताखियां’ या चित्रपटात शनाया कपूरसोबत झळकणार आहे. याशिवाय, डॉन-3 मध्ये देखील त्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.





