#IPL2022 | आवेशचे भवितव्य उज्ज्वल – गावसकर
Updated On:

मुंबई – लखनौ सुपर जायंट्सचा नवोदित गोलंदाज आवेश खान याचे विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी कौतुक केले आहे. येत्या काळात आयपीएल स्पर्धेतील याच अनुभवाने आवेशच्या गोलंदाजीत आणखी सुधारणा होइल व पुढील काळात तो भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख गोलंदाजांमध्ये दाखल झालेला असेल, असेही गावसकर यांनी म्हटले आहे.
सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत दोन सामन्यात त्याने अफलातून गोलंदाजी केली आहे. त्याला बळी घेण्यात मोठे यश मिळाले नसले तरीही तो गुणवान गोलंदाज आहे. त्याच्या भात्यात यॉर्कर, स्लोअरवन, लेग कटर, अवे स्विंगर असे कितीतरी अस्त्रे आहेत. त्याच्या गोलंदाजीत वेगही आहे व स्विंग देखील त्यामुळेच यंदाच्या स्पर्धेत तो सर्वात भरवशाचा गोलंदाज वाटतो, असेही गावसकर यांनी सांगितले.





