शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद- विखे पाटील
Updated On:

अहमदनगर : केंद्रीय मंत्री निर्मला सीताराम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सबका साथ सबका विकास या घोषणेला अनुसरून असून सर्वसामान्य माणसाला समर्पित असल्याचे मत भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
आरोग्य, शिक्षण, शेतीसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद असून अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेला बळकटी दिल्याचे विखे म्हणाले. शेतकर्यांसाठी झिरो बजेट शेतीची मांडलेली संकल्पना शेतकर्यांना दिलासा देणारी आहे. कृषी अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी 16 सुत्री कार्यक्रम सादर झाल्यामुळे शेतकर्यांना फायदा होईल अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.





