विकास दुबेच्या फरारी साथीदाराला अटक
Updated On:

लखनौ – पोलीस चकमकीत ठार झालेला उत्तर प्रदेशातील गॅंगस्टर विकास दुबे याचा फरारी साथीदार बाल गोविंद दुबे ऊर्फ लालू याला पोलिसांच्या टास्क फोर्सने चित्रकुट येथे अटक केली आहे. त्याला पकडून देण्यासाठी पोलिसांनी 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
लालू हा कानपूर जिल्ह्याच्या बिकरू गावातील रहिवासी होता. विकास दुबे यांच्या हत्येनंतर तो आपली ओळख बदलून विविध ठिकाणी राहात होता. त्यामुळे तो इतके दिवस पोलिसांना गुंगारा देऊ शकला होता.
गेल्या महिन्यात विकास दुबेच्या साथीदारांनी कानपूरमध्ये आठ पोलिसांची हत्या केली होती. त्या प्रकरणात आपलाही सहभाग असल्याची कबुली त्याने दिली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.





