“जीतेंगे दिल्ली…” ! बॉक्सर विजेंदर सिंह उतरणार निवडणुकीच्या मैदानात? ; ‘त्या’ पोस्टरमुळे चर्चांना उधाण

vijender singh । दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (आप) सर्व 70 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत . तर काँग्रेसने देखील त्यांची 21 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. आता भाजपही लवकरच उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत व्यस्त आहे.
पक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, “भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आठवडाभरात बैठक झाल्यानंतर सर्व 70 जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली जाऊ शकतात. अशा परिस्थितीत बॉक्सर विजेंदर सिंग भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपकडून उमेदवारीची शक्यता vijender singh ।
समोर आलेल्या माहितीनुसार, ‘काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेला बॉक्सर विजेंदर सिंगला भाजप दक्षिण दिल्लीतून उमेदवारी देऊ शकते. 2019 मध्ये त्यांचा भाजप नेते रमेश बिधुरी यांच्याकडून पराभव झाला होता. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विजेंदर सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
‘दिल्ली जिंकणार’ असे शीर्षक देऊन विजेंदर सिंगने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले आहे
Jitenge delhi @BJP4Delhi 👊🏽 @Virend_Sachdeva pic.twitter.com/D76YbIb3FT
— Vijender Singh (@boxervijender) December 23, 2024
गेल्या दिल्ली निवडणुकीची आकडेवारीvijender singh ।
दिल्ली विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ 2025 मध्ये संपत असून फेब्रुवारीमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 70 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 67 जागा जिंकून पूर्ण बहुमताने सत्तेवर आले.
यावेळी पुन्हा आम आदमी पक्षाने दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत होणाऱ्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी केली आहे. त्याचबरोबर भाजप आणि काँग्रेसनेही पुन्हा सत्तेत येण्यासाठी तयारी सुरू केली आहे.





