Vijaypat Singhania death: देशातील नामांकित उद्योगपती, रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते विजयपत सिंघानिया यांचं वयाच्या 87 व्या वर्षी मुंबईत निधन झालं. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र आणि रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया यांनी दिली. उद्योग, विमान चालन आणि सामाजिक क्षेत्रात मोठं योगदान देणाऱ्या या दिग्गज व्यक्तिमत्त्वाच्या जाण्यानं अनेकांनी दुःख व्यक्त केलं. विजयपत सिंघानिया हे केवळ उद्योगपती नव्हते, तर ते एक कुशल एव्हिएटर म्हणूनही ओळखले जायचे. हॉट एअर बलूनद्वारे सर्वाधिक उंची गाठण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे. रेमंड या वस्त्र ब्रँडला देश-विदेशात ओळख मिळवून देण्यात विजयपत सिंघानिया यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रेमंडने जागतिक स्तरावर झेप घेतली. दरम्यान , त्यांच्या जाण्याने उद्योग क्षेत्रातील एक मोठं युग संपल्याची भावना व्यक्त केली जातीय. ३७% हिस्सा मुलाकडे हस्तांतरित २०१५ मध्ये, विजयपत सिंघानिया यांनी रेमंड ग्रुपमधील आपला संपूर्ण ३७% हिस्सा मुलगा गौतम सिंघानिया याच्याकडे हस्तांतरित केला. तेव्हापासून, कंपनीवर गौतमचे पूर्ण नियंत्रण आहे. दोन दशके कंपनीचे नेतृत्व केले Vijaypat Singhania death: विजयपत सिंघानिया यांनी १९८० पासून रेमंड ग्रुपचे नेतृत्व केले आणि जवळपास २० वर्षे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. २००० सालापर्यंत, त्यांनी कंपनीला देशातील आघाडीच्या कपड्यांच्या ब्रँडपैकी एक बनवले होते. Vijaypat Singhania death: अंदाजे ₹१२,००० कोटींची संपत्ती मागे ठेवली माध्यमांच्या वृत्तानुसार, विजयपत सिंघानिया यांनी अंदाजे ₹१२,००० कोटींची संपत्ती मागे ठेवली आहे. तथापि, त्यांनी आपल्या हयातीतच कंपनीतील एक मोठा हिस्सा मुलाकडे हस्तांतरित केला होता. १९९१ च्या आर्थिक उदारीकरणापूर्वीच त्यांनी कंपनीला स्पर्धेसाठी तयार केले होते, ज्यामुळे बदलत्या बाजारपेठेत रेमंडची ताकद कायम राहिली. वडील आणि मुलामध्ये वाद होता काही वर्षांपूर्वी, विजयपत सिंघानिया आणि गौतम सिंघानिया यांच्यात मालमत्ता आणि कंपनीवरून कायदेशीर वाद निर्माण झाला होता. तथापि, नंतर दोघांमध्ये तडजोड होऊन हे प्रकरण मिटले. पद्मभूषण पुरस्कार विजेते, कुशल वैमानिक विजयपत सिंघानिया यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते एक निष्णात वैमानिक आणि साहसी व्यक्तीही होते. २००५ मध्ये, त्यांनी हॉट एअर बलूनमधून सुमारे ६९,००० फूट उंची गाठून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी, १९८८ मध्ये, त्यांनी मायक्रोलाइट विमानातून लंडन ते नवी दिल्ली असा एकट्याने उड्डाण करून विक्रम प्रस्थापित केला होता. उद्योगाचे मोठे नुकसान Vijaypat Singhania death: विजयपत सिंघानिया यांचे निधन भारतीय उद्योगासाठी एक मोठे नुकसान मानले जात आहे. त्यांनी केवळ व्यवसायातच यश मिळवले नाही, तर आपल्या साहसी कृत्यांनीही स्वतःला वेगळे सिद्ध केले.