‘मटका किंग’मध्ये दिसणार विजय वर्मा – सई ताम्हणकर ‘एकत्र’

प्राइम व्हिडीओवरील ‘मटका किंग’ या वेब सिरीज चर्चा रिलीज होण्यापूर्वी पासून होत आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले असल्यामुळे प्रेक्षकही या वेब सिरीजची आतुरतेने वाट पाहत आहे. नागराज मंजुळे यांच्यासह अभय कोराणे यांनी या मालिकेचे लेखन केले आहे.
अशात ‘मटका किंग’ या वेब सिरीजमधील स्टार कास्टचे पोस्ट रिलीज करण्यात आले आहे. अभिनेता विजय वर्माला परिचयाची गरज नाही. समर्पण, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘रंगरेज’, ‘सुपर 30’, ‘लस्ट स्टोरीज 2’, आलिया भट्ट स्टारर ‘डार्लिंग्स’, ‘मर्डर मुबारक’ आणि इतर चित्रपटांमधील भूमिकांसाठी हा अभिनेता ओळखला जातो. दरम्यान, ‘मटका किंग’ या आगामी वेब सिरीज मधील विजय वर्माचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करून चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे.
”मटका किंग’ हा क्राईम थ्रिलर आहे. यामध्ये विजय वर्मा मुख्य भूमिकेत पूर्णपणे आकर्षक दिसत आहे. तर विजय सोबत मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरची केमेस्ट्री दिसणार आहे. ‘मटका किंग’ मालिकेची कथा 1960 च्या मुंबई शहरात सेट केलेल्या एका काल्पनिक कथेभोवती फिरतो, जिथे एक कापूस व्यापारी मटका हा जुगार खेळतो. हळुहळू खेळाला अभूतपूर्व गती मिळू लागते आणि पुढे काय होते ते बाकीच्या मालिकेचा आधार बनते. या मालिकेत विजय वर्माशिवाय कृतिका कामरा, सई ताम्हणकर, गुलशन ग्रोव्हर आणि सिद्धार्थ जाधव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.





