विजयस्तंभ सन्मान मोर्चा मंत्रालय मुंबईकडे रवाना

वाघोली – कोरेगाव भीमा जयस्तंभाची दुरुस्ती तसेच विविध मागण्यांसाठी जय स्तंभ ते मुंबई मंत्रालय तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानावर विजयस्तंभ सन्मान मोर्चा पायी गुरुवारी (दि.१२) रवाना झाला. या मोर्चामध्ये भीमसैनिक सहभागी झाले.
जय स्तंभाची तातडीने दुरुस्ती करावी, २०१८ च्या भिमा कोरेगाव दंगलीतील ३० हजार कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत जयस्तंभ विकास कामासाठी १०० कोंटीची तरतुद करून शौर्यदिनासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी. जयस्तंभ परिसरातील खाजगी जमीन अधिग्रहण करावी जयस्तंभ व छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ यांचा समावेश पुणे दर्शन मध्ये करावा. १९७१ च्या युध्दातील सैनिकांची काळी पाटी लावण्यात आली असून ती तात्काळ काढून दुसर्या ठिकाणी सन्मानपूर्वक लावण्यात यावी. जयस्तंभाच्या ठिकाणी येण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन येथुन स्वतंत्र बस सोडण्यात यावी त्याच बरोबर पार्किंग साठी जयस्तंभाजवळ शासकीय जागेत आरक्षण टाकण्यात यावे आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
जयस्तंभापासून पायी मोर्चाला सुरुवात झाली असून पुणे, पिंपरी चिंचवड, लोणावळा, पनवेल मार्गे मुंबईत धडकणार आहे.





