Vijay Mallya : विजय मल्ल्या अजूनही कायद्यापासून पळतोय; ईडीची मुंबई उच्च न्यायालयात माहिती
मनी लाँड्रिंग प्रकरणी फरार झालेला विजय मल्ल्या (Vijay Mallya) अजूनही भारतातील कायदेशीर प्रक्रियेपासून दूर पळत आहे आणि बँकांनी कर्ज वसुली केली असली तरी त्यावरून मनी लाँड्रिंगच्या आरोपांतून मुक्त होत नाहीत, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबई उच्च न्यायालयात दिली.

Vijay Mallya : मनी लाँड्रिंग प्रकरणी फरार झालेला विजय मल्ल्या (Vijay Mallya) अजूनही भारतातील कायदेशीर प्रक्रियेपासून दूर पळत आहे आणि बँकांनी कर्ज वसुली केली असली तरी त्यावरून मनी लाँड्रिंगच्या आरोपांतून मुक्त होत नाहीत, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबई उच्च न्यायालयात दिली.
मल्ल्याने (Vijay Mallya) २०२० मध्ये दाखल केलेल्या याचिकेला उत्तर म्हणून या केंद्रीय तपास संस्थेने आपले प्रतिज्ञापत्र सादर केले. आपल्यावरील फौजदारी खटले बंद करावेत, अशी मागणी मल्ल्याने या याचिकेद्वारे केली होती. कर्ज वसुली झाल्यानंतर बँकांसोबतचा आपला वाद मिटला आहे, असा दावा त्याने केला होता.
ईडीने म्हटले की, १४,१३१.६ कोटी रुपये मूल्याची जंगम आणि स्थावर मालमत्ता एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाला हस्तांतरित करण्यात आली होती. परंतु यामुळे मल्ल्यावरील मनी लाँड्रिंगचे आरोप रद्द होत नाहीत किंवा ते मागे घेतले जात नाहीत. मल्ल्या मार्च २०१६ मध्ये भारत सोडून गेला आणि वारंवार समन्स बजावूनही तपास यंत्रणेसमोर हजर झाला नाही. तसेच, त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले होते, असेही त्यात म्हटले आहे.
नोव्हेंबर २०१६ मध्ये मल्ल्याला (Vijay Mallya) घोषित गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. उच्च न्यायालयाने भारतात कधी परतणार आहे? आणि येथील न्यायालयात हजर होणार आहे का? अशी विचारणा करूनही मल्ल्याने आपल्या उत्तरांमध्ये संदिग्ध भूमिका कायम ठेवली, असेही ईडीने नमूद केले.






