Actor Vijay Deverakonda : दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा हा हिंदी प्रेक्षकांमध्येही खूप लोकप्रिय आहे. जगभरात लोकप्रिय झालेल्या अनेक दक्षिण भारतीय स्टार्सपैकी विजयकडे पाहिले जाते. मात्र, २०२५ हे वर्ष विजयसाठी फारसे चांगले नव्हते. आता त्याच्या आगामी चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे. त्याच्या काही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळला असून काही चित्रपट फारसे यशस्वी झाले नाहीत. यावर्षी त्याचा ‘किंगडम’ हा चित्रपट थिएटरमध्ये मोठ्या उत्साहात प्रदर्शित झाला. परंतु चित्रपटाला बॅाक्स अॅाफिसवर फारसे यश मिळाले नाही. चाहत्यांना त्याचा सिक्वेल येईल अशी आशा होती, पण चित्रपटाने चांगली कामगिरी केली नसल्याने दुसरा भाग येणार याबाबत संभ्रमता निर्माण झाली आहे. हा चित्रपट दिग्दर्शित केला जात होता, तेव्हा निर्मात्यांनी दोन भागात चित्रपट तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. चित्रपटाच्या पहिल्या भागात निर्मात्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. चित्रपटाला त्याचे बजेटही वसूल करता आले नव्हते. त्यामुळे सध्या तरी त्याचे काम थांबवण्यात आले आले असल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पहिल्या भागाची कमाई पाहता, चित्रपट बनवायचा की नाही याबद्दल निर्मात्यांना शंका आहे. या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले असेल तर, विजय देवरकोंडा याच्यासोबत दक्षिणेतील अभिनेत्री भाग्यश्री बोरसेने काम केले होते. १३० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटाने केवळ ८२ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे निर्माते सिक्वलबाबत कोणता निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : ‘मिर्झापूर’मधील अभिनेत्रीची ‘ॲनिमल’ चित्रपटावर टीका; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल