Satara: विद्यानंद बापट यांना रविवारी हिरवाई पुरस्कार प्रदान होणार
Satara पुरस्काराचे स्वरूप शाल,श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि दहा हजार रुपयांचा धनादेश असे आहे. रविवार, दि. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता येथील कर्मवीर सभागृह, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Satara: विचारांचा ध्यास घेतलेले आणि सामाजिक प्रश्नांवर निर्भीडपणे भूमिका मांडणारे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना यंदाचा 17 वा कै. पांडुरंग चौगुले स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ’हिरवाई पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती हिरवाई संस्थेच्या अध्यक्षा संध्या चौगुले यांनी दिली.
पुरस्काराचे स्वरूप शाल,श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि दहा हजार रुपयांचा धनादेश असे आहे. रविवार, दि. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता येथील कर्मवीर सभागृह, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय विदेश सेवेतील निवृत्त अधिकारी आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ज्ञानेश्वर मुळे उपस्थित राहणार आहेत. हा पुरस्कार प्रदान सोहळा साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.
हिरवाई सोशल अँड एज्युकेशनल ऑर्गनायझेशनच्यावतीने सामाजिक क्षेत्रात निष्ठेने काम करणार्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार दिला जातो. समाजात सकारात्मक बदल घडविणार्या व्यक्तींच्या कामातून इतरांनाही प्रेरणा मिळावी, हा या पुरस्कारामागील मुख्य हेतू आहे.
यंदाचे पुरस्कारार्थी विद्यानंद बापट यांनी पुण्यातील सार्वजनिक उत्सवांमध्ये होणारे ध्वनिप्रदूषण, कर्णकर्कश डीजे आणि सार्वजनिक रस्त्यावरील मंडपांमुळे रहदारीला होणारा अडथळा, वाहतूक कोंडी आणि यातून नागरिकांना होणारा त्रास याविरोधात सातत्याने आवाज उठवला आहे. या सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन हिरवाई संस्थेच्या अध्यक्षा व कार्यक्रमाच्या निमंत्रक प्रा. संध्या चौगुले यांनी केले आहे.





