Vidyananda Bapat : विद्यानंद बापटांकडून थेट दाभोळकरांचा संदर्भ; मारहाणीच्या घटनेनंतर माध्यमांसमोर येत काय म्हणाले?
Vidyananda Bapat : विद्यानंद बापट यांच्या समर्थनार्थ पुणेकर एकत्र येत मोर्चा काढणार आहेत.

Vidyananda Bapat : पुण्यात डीजेला विरोध दर्शवत विद्यानंद बापट मैदानात उतरले. आपली मतं त्यांनी माध्यमांसमोर मांडली. मात्र, काल एका वाहिनीसोबत संवाद साधताना त्यांच्यावर एका तरुणाने हल्ला केला. या घटनेनंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. बापट यांच्यावर हल्ला करण्याऱ्या संतोष चव्हाण नावाच्या तरुणाला पोलिसांनी तीन तासात अटक केली. या घटनेनंतर आज विद्यानंद बापट माध्यमांसमोर आले आणि त्यांनी हल्लेखोराला सडेतोड शब्दांत उत्तर दिले.
पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून मिरवता, मग गुंडगिरी अन् मारहाण हीच तुमची संस्कृती आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी जे माकडचाळे करत धुडगूस घालत आहेत, त्यांना माझ्या मुद्द्यांचा वैचारिक प्रतिकार करता येत नाही, म्हणूनच त्यांनी माझ्यावर भ्याड हल्ला केला. पण अशा मारहाणीने माझा निश्चय ढळणार नाही. मी अशा लोकांना गांभीर्याने घेतच नाही, अशा शब्दांत रोखठोक उत्तर दिले.
…पण मी त्या दिवशी जिवंत राहिलो, तरच त्या मोर्चात सहभागी होईन.
विद्यानंद बापट यांच्या समर्थनार्थ पुणेकर एकत्र येत मोर्चा काढणार आहेत. रविवारी या मोर्चाचे आयोजन रविवारी करण्यात आले आहे. या मोर्चाविषयी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केले. ते म्हणाले “माझं पुढे काय होईल हे सांगता येत नाही. नरेंद्र दाभोलकर देखील सकाळी नेहमीसारखेच मॉर्निंग वॉकला निघाले होते… रविवारी पुणेकरांनी माझ्या समर्थनार्थ मोर्चा काढला आहे. पण मी त्या दिवशी जिवंत राहिलो, तरच त्या मोर्चात सहभागी होईन. तसेच जी मागणी ते करत आहेत त्याला आता संघटात्मक स्वरुप द्यावं लागणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केल्याने डीजेचा मुद्दा आणखी तापणार आहे.
पुण्यातील नारायण पेठेत राहणारे विद्यानंद बापट हे अवघ्या महाराष्ट्राला आता परिचयाचे झाले आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे तर काहींनी त्यांच्या भूमिकेस असमर्थता दर्शवली आहे. त्यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर पोलिसांनी त्यांना २४ तास पोलीस सुरक्षा देणार असल्याचे जाहीर केले आहे.
Srinagar Airport: इंडिगो विमानाला अचानक अपघात ; श्रीनगर विमानतळावर ब्रेक यंत्रणा फेल






