नगर -विडी कामगार चळवळीतील नेते तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षातील ज्येष्ठ नेते कॉ. शंकर न्यालपेल्ली यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 70 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने विडी कामगार चळवळीत पोकळी निर्माण झाली आहे.
कॉ. न्यालपेल्ली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिलचे सदस्य होते. तसेच भाकपचे जिल्हा सचिव, महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशनचे सरचिटणीस, आयटकचे जनरल बॉडी सदस्य, श्रमिकनगर येथील हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन होते.
त्यांनी शेवट पर्यंत विडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. विडी कामगारांची घरे होण्यासाठी देखील त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
त्यांच्या निधनाने भाकपचे राष्ट्रीय जनरल सचिव कॉ.डी. राजा, राष्ट्रीय सचिव कॉ. भालचंद्र कांगो, राज्य सचिव तुकाराम भस्मे, राज्य सहसचिव कॉ.सुभाष लांडे, शांताराम वाळुंज, भैरवनाथ वाकळे, ऍड. सुधीर टोकेकर, कॉ. स्मिता पानसरे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तर त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.